Corona Cases in Akola : आणखी ३१ पॉझिटिव्ह, ८३ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 19:39 IST2021-06-20T19:39:02+5:302021-06-20T19:39:07+5:30

Corona Cases in Akola : आणखी ३१ पॉझिटिव्ह, ८३ जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Akola: 31 more positive, 83 beat Corona | Corona Cases in Akola : आणखी ३१ पॉझिटिव्ह, ८३ जणांची कोरोनावर मात

Corona Cases in Akola : आणखी ३१ पॉझिटिव्ह, ८३ जणांची कोरोनावर मात

अकोला : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, शनिवार २० जून रोजी जिल्ह्यात ३१ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर ८३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५७४१४ वर पोहोचला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीलएल लॅबकडून रविवारी एकूण ७३१ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी केवळ १५ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ७१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये बाळापूर तालुक्यातील एक, तेल्हारा तालुक्यातील एक, अकोट तालुक्यातील तीन, मुर्तिजापूर तालुक्यातील एक व अकोला मनपा क्षेत्रातील नऊ जणांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात पार पडलेल्या ९९९ रॅपिड ॲंटिजन चाचण्यांमध्ये केवळ १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

 

८३ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, खासगी कोविड रुग्णालयांमधील १६, तर होम आयसोलेशन मधील ६० अशा एकूण ८३ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

८७९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,४१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,४१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Corona Cases in Akola: 31 more positive, 83 beat Corona