मुख्य डाकघरातील कोअर बँकिंग प्रणाली गुरुवारपासून ग्राहकांच्या सेवेत - ४ जूनला दिवसभर आर्थिक व्यवहार बंद राहणार
By Admin | Updated: June 3, 2014 01:57 IST2014-06-02T22:03:33+5:302014-06-03T01:57:08+5:30
अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.

मुख्य डाकघरातील कोअर बँकिंग प्रणाली गुरुवारपासून ग्राहकांच्या सेवेत - ४ जूनला दिवसभर आर्थिक व्यवहार बंद राहणार
अकोला : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्षकांनी दिली.
अकोल्यातदेखील पोस्टाची कोअर बँकिंग प्रणाली सुरू होणार हे ऐकून, वाचून असलेल्या पोस्टाच्या ग्राहकांसाठी खूशखबर असून, चुटकीसरशी आर्थिक व्यवहार करणारी ही प्रणाली येत्या गुरुवारपासून येथील मुख्य डाकघरात कार्यान्वित करण्यात येत आहे. पोस्टाचे बचत खाते वापरणार्या ग्राहकांना यामुळे अकोल्यातून आर्थिक व्यवहार करणे अधिक सोईस्कर होणार आहे. संपूर्ण राज्यातील डाकघरांमध्ये ही कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्य सुरू करण्यात आले आहे. सदर कार्यप्रणाली कार्यन्वित करताना तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने बुधवार, ४ जून रोजी येथील मुख्य डाकघरातील बहुतांश आर्थिक व्यवहार संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अक्षीकांनी दिली.