कॉन्व्हेटचे विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:49 IST2017-12-08T01:47:26+5:302017-12-08T01:49:38+5:30
बाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

कॉन्व्हेटचे विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून वंचित
अनंत वानखडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील  कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र  आहे.
राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण भागातील जि.प.  नगर परिषदेच्या व शासकीय अनुदानातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा  मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. शहरासह तालुक्यातील एकूण १७४ शाळे तील ३0 हजार ७८५ विद्यार्थ्यांची तपासणी या सत्रात करण्यात आली. तसेच १  हजार ८६४ विद्यार्थी आरोग्य तपासणीला गैरहजर झाले. या तपासणीतून गेल्या पाच  वर्षांत २२ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले, तर १४ विद्यार्थ्यांच्या  पालकांनी हृदयशस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे.
शालेय आरोग्य तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व २ आरोग्य  कर्मचारी, असे एकूण चार जणांचे पथक आहे. दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या  विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केला जातो. एका विद्यार्थ्यासाठी शासन दीड लाखांपर्यंत  मोफत खर्च करीत आहे. मात्र, तालुक्यातील थॅलेसिमियाग्रस्त विद्यार्थ्यांना या सेवेचा  लाभ मिळत नाही. नगर परिषदेच्या उर्दू, मराठीच्या १५ शाळेतील २ हजार १७७  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला; परंतु ५0 हजार लोकसंख्येच्या शहरातील ९ नर्सरी  कॉन्व्हेंटमध्ये ५ हजारांच्यावर विद्यार्थी संख्या आहे. दारिद्रय़रेषेखालील  सर्वसाधारण व्यक्तीने शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊ झोपडपट्टीत राहून, आपला  उदरनिर्वाह करीत असला, तरी आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेमध्ये टाकले आहे.  अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांंना शिक्षण विभाग मात्र विनाअनुदानित असल्याचे कारण  पुढे करीत, आरोग्य तपासणी करत नसल्याचे चित्र आहे. 
गरजु विद्यार्थ्यांना मिळत नाही लाभ
- लहानपणी तपासणी न झाल्यामुळे अनेक गरजू गरीब कुटुंबातील पालक आपल्या  पाल्याला महागडे आरोग्य उपचार देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी उ पचाराअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहे. शहरानजीकच्या अनेक झोपडपट्टी  भागातील विद्यार्थी मोफत शिक्षण न घेता विनाअनुदानित कॉन्व्हेंटमध्येच शिक्षण घेत  आहेत. यास शिक्षण विभागा कारणीभूत आहे. 
- ग्रामीण व शहरी भागातील अनुदानित, विनाअनुदानित हा भेदभाव न करता शिक्षण विभागाने शिक्षण घेणार्या सर्वच विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांंच्या पालकांनी केली आहे. झोपडपट्टीभागा तील अनेक विद्यार्थी दुर्धर आजाराने ग्रासलेले आहेत. शिक्षण विभागाने आरोग्य अभियान योजनेचा लाभ देण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळेत आरोग्य तपासणी करण्याचा आदेश  दिल्यास सर्वच विद्यार्थ्यांंची शाळेतून तपासणी करू.  
-डॉ. चेतन टिकार, वैद्यकीय अधिकारी, शहरी विभाग