शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

वाद चिघळला; १४ जानेवारीच्या ‘सीएम’ चषक स्पर्धेवर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:47 PM

अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे.

अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. ६ जानेवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते वसंत देसाई क्रीडांगणावर पार पडलेल्या स्पर्धेवरून भाजपमधील अंतर्गत मतभेदाची दरी अधिकच रुंदावल्याचे मंगळवारी समोर आले. भाजपच्या पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत १४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यावेळी भाजयुमोच्या एका प्रमुख पदाधिकाºयाने पाठ फिरविल्याची खमंग चर्चा सुरू होती.खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय तालुका स्तरावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेता संघ व खेळाडू दुसºया टप्प्यात पार पडणाºया जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा स्तरावरील स्पर्धेचे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत ५ ते १५ जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या धर्तीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ६ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय चषक स्पर्धेचे उद्घाटन केले होते. यावर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष तथा ‘सीएम’ चषक स्पर्धेचे संयोजक डॉ. संजय शर्मा यांनी आक्षेप घेत जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन १४ जानेवारी रोजी होणार असल्याचा दावा केला होता. एकाच स्पर्धेचे दोन वेळा उद्घाटन होणार असल्याने खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे याप्रकरणी ८ जानेवारी रोजी पक्ष कार्यालयात निर्णय घेतला जाणार होता. त्यानुषंगाने मंगळवारी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. किशोर मालोकार, डॉ. बाबूराव शेळके, श्रीकृष्ण मोरखडे, धनंजय गिरधर, गणेश कंडारकर, मंचितराव पोहरे, अनिल गावंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसºया टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांचे आयोजन १४ ते १५ जानेवारी रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला.खेळाडू संभ्रमात!भाजपमधील अंतर्गत वादात जिल्ह्यातील खेळाडू नाहक भरडल्या जात आहेत. जिल्हास्तरीय सामने ६ व ७ जानेवारी रोजी पार पडल्यानंतर आता पुन्हा १४ व १५ जानेवारी रोजी सामन्यांचे आयोजन होणार आहे. अशा स्थितीत नेमक्या कोणत्या सामन्यातील अंतिम विजेता राज्य स्तरासाठी पात्र ठरला जाईल, यावरून खेळाडूंमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका