प्रेमीयुगुल-पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:01 AM2017-10-02T02:01:39+5:302017-10-02T02:02:01+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी  रात्री धुडगूस घालणार्‍या काही युवतींसह त्यांचे मित्र व  पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. सदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेले, मात्र यशस्वी मध्यस्थी  केल्यानंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.

Controversy among lovers of love-pakv | प्रेमीयुगुल-पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद

प्रेमीयुगुल-पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद

Next
ठळक मुद्देसदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेलेयशस्वी मध्यस्थीनंतर प्रकरण आपसात मिटविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी  रात्री धुडगूस घालणार्‍या काही युवतींसह त्यांचे मित्र व  पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. सदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेले, मात्र यशस्वी मध्यस्थी  केल्यानंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.
दसर्‍याच्या रात्री काही युवक-युवती पीकेव्हीच्या जंगलामध्ये  फिरण्यासाठी गेले होते. रात्री उशीर झालेला असतानाही या  युवक-युवतींचा या परिसरात धुडगूस सुरूच असल्याची माहिती  मिळाल्यानंतर काही विद्यार्थी त्यांना बाहेर काढण्यासाठी गेले,  याच कारणावरून युवक-युवती व विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.  त्यानंतर सदर प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले,  पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  केली. मात्र, ठाणेदार किशोर शेळके व पोलिसांनी युवक-युवती  आणि विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण आपसात  मिटविण्यात आल्याची माहिती ठाणेदार शेळके यांनी दिली.
-
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआड
अकोला : बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष देत, तसेच  त्यांना नोकरीचे बनावट कॉल लेटर देणार्‍या टोळीतील म्होर क्यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी रविवारी अटक केली.  शुद्धोधन तायडे, असे आरोपीचे नाव असून, तो अमरावती ये थील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अकोल्यातील सचिन कुरई, धनंजय दांदळे या दोघांसह आणखी  एका बेरोजगार युवकास अमरावती तसेच यवतमाळ येथील  रहिवासी सागर गोक्टे व म्होरक्या शुद्धोधन तायडे या दोघांनी  नोकरीचे आमिष देऊन, पैसे मागितले होते. या दोघांच्या  आमिषाला बळी पडत सचिन कुरई दांदळे यांनी रोकडही दिली  होती. त्यानंतर शुद्धोधन तायडे व गोक्टे यांनी या बेरोजगार  युवकांना नोकरीचे बनावट कॉल लेटर पाठवून उर्वरित रक्कम  मागितली. मात्र, या बेरोजगार युवकांना फसवणूक झाल्याचे  लक्षात येताच त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार  दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून या प्रकरणातील आरोपी  अमोल गोक्टे याला अटक केली, त्यानंतर अमरावती येथील  शुद्धोधन तायडे याच्या घरी जाऊन बनावट शिक्के व धनादेश जप्त  करण्यात आले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुद्धोधन  तायडे याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. सोमवारी  त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई  ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाइन्स  पोलिसांनी केली.

Web Title: Controversy among lovers of love-pakv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.