सं त त धा र !
By Admin | Updated: July 24, 2014 02:07 IST2014-07-24T02:03:00+5:302014-07-24T02:07:05+5:30
अकोल्या जिल्ह्यात पावसाचा तडाखा: एक जण वाहून गेला, २२ गावांचा संपर्क तुटला, वस्त्यांमध्ये पाऊस.

सं त त धा र !
अकोला- पावसाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना दडी मारून बसलेल्या पावसाने उशिरा का होईना दमदार ह्यएन्ट्रीह्ण केली. या पहिल्याच दमदार पावसाचा तडाखा अकोला जिल्ह्याला बसला. नदी, नाल्यांना आलेल्या पुराने अकोला, तेल्हारा शहरासह आकोट, बाळापूर, मूर्तिजापूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील अनेक गावांत पाणी वस्त्यांमध्ये शिरले. त्यामुळे घरांची पडझड झाली. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३0.७९ मिलीमीटर पाऊस पडला. या पावसाने जिल्ह्यात २२ गावांचा संपर्क तुटला असून रौंदळा येथे एक जण वाहून गेल्याचे वृत्त आहे.
सोमवारी मध्यरात्रीनंतर रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर आणि रात्री १0 वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. रात्री १0 वाजतानंतर मात्र पावसाचा जोर वाढला. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. जिल्ह्यात सातही तालुक्यांमध्ये बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३0.७९ मिलीमीटर पाऊस पडला. सर्वाधिक २२४.0४ मि.मी. पावसाची नोंद आकोट तालुक्यात झाली. त्यापाठोपाठ तेल्हारा तालुक्यात १७0 मि.मी. पाऊस पडला. पातूर १२३, अकोला ११९, बाश्रीटाकळी ११५ आणि बाळापूर तालुक्यात १0२ मि.मी.पावसाची नोंद झाली. मूर्तिजापूर तालुक्यात ६२.५0 मि.मी. पाऊस पडला. तेल्हारा तालुक्यातील वान धरणाची पातळी वाढली असून, ८४ टक्के धरण भरले आहे. या धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आकोट तालुक्यातील रौंदळा गावाजवळ शेगाव रोडवर नाल्याला आलेल्या पुरामुळे एम.टी. ४८ एच.१९९0 या क्रमांकाच्या ट्रक पुलाखाली पडून ट्रक चालक पुरात वाहुन गेला. ट्रकचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते, पण तो आढळून आला नाही.
*धरणांमध्ये असा उपलब्ध जलसाठा !
प्रकल्प जलसाठा द.ल.घ.मी. टक्केवारी
काटेपूर्णा १८.0१ २१.६८
मोर्णा ११.४१ २७.५२
निगरुणा 0.0३ २0.९0
उमा 0.२४ 0६.३४
दगडपारवा 00 00
वान ५१.७३ ८७.६१
*मोर्णा नदीला पूर
४सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोर्णा नदीला पूर आला असून, नदीकाठावर राहणार्या नागरिकांना प्रशासनाद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला.