शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 10:43 IST

Akola News : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

अकोला: जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासनाच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदमार्फत ५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या तसेच धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांच्या ठिकाणी नवीन बांधकामे आणि स्वच्छतागृहांच्या बांधकामांसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदमार्फत २७ जुलै रोजी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी ५ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच एका शाळेतील स्वच्छतागृह बांधकामासाठी ३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मंजूर निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांची बांधकामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

 

समग्र शिक्षा बांधकाम विभाग करणार बांधकामे!

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये ५३ वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी शासनाकडून मंजूर निधीतून वर्गखोल्यांची बांधकामे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

 

प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम तसेच समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५३ वर्गखोल्या आणि एक स्वच्छतागृह बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर निधीतून समग्र शिक्षा अभियानच्या बांधकाम विभागामार्फत वर्गखोल्यांची बांधकामे करण्यात येणार आहेत.

-- दिलीप तायडे

उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळा