Constitution is the key to the concept of a welfare state - justice. Bhushan Gawai | राज्यघटना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली - न्या. भूषण गवई

राज्यघटना ही कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली - न्या. भूषण गवई

अकोला : राज्यघटना ही भारतातील कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली आहे. घटनेत कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. राज्यघटनेतील निर्देशक सिद्धांत व मूलभूत अधिकाराच्या जागरणाने कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होऊ शकते.यासाठी कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले
 दि अकोला एज्युकेशन सोसायटीच्या शतकीय वाटचालीच्या निमित्ताने रामदास पेठ पो स्टे.समोरील अकोला विधी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात स्व.बालचंद लोहिया स्मरणार्थ आयोजित प्रगतीशील कायदे आणि कल्याणकारी राज्य या विषयावर न्या.गवई मार्गदर्शन करीत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सौ पुष्पा गणेडीवाल, जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्या.खोब्रागडे उपस्थित होते.अकोला एजुकेशन सोसा.चे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब मांडवगणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे,संस्थेचे सचिव,एस.आर.अमरावतीकर, प्रा,एस.सी.भंडारी, प्राचार्य रत्ना चांडक आदी उपस्थित होते.  

Web Title: Constitution is the key to the concept of a welfare state - justice. Bhushan Gawai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.