नाराज शिवसंग्रामचे जुळले काँग्रेस-राकाँशी सूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:25 IST2019-12-29T12:24:57+5:302019-12-29T12:25:08+5:30

शिवसंग्रामचे जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचा प्रचार करतील, अशी माहिती शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

Congress-Ncp yarn matches with angry Shiv Sangram! | नाराज शिवसंग्रामचे जुळले काँग्रेस-राकाँशी सूत!

नाराज शिवसंग्रामचे जुळले काँग्रेस-राकाँशी सूत!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यस्तरावर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामला अकोल्यातील भाजपने सातत्याने डावलले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसंग्रामने मागितलेल्या चार जागाही भाजपने न दिल्यामुळे अखेर शिवसंग्रामने काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील निमकर्दा सर्कलमध्ये शिवसंग्रामला एक जागा देण्यात आली असून, शिवसंग्रामचे जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचा प्रचार करतील, अशी माहिती शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासोबत शनिवारी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय शिवसंग्रामने जाहीर केला. त्यानुसार निमकर्दा सर्कलमध्ये शिवसंग्रामचा उमेदवार आघाडी समर्थित असेल, असे ठरले. या निवडणुकीत शिवसंग्राम काँग्रेस महाआघाडीचा प्रचार करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Congress-Ncp yarn matches with angry Shiv Sangram!

टॅग्स :Akolaअकोला