शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

काँग्रेस आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:55 IST

मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेता येथे आघाडी व ‘वंचित’मध्ये उमेदवार निश्चितीसाठी सध्या सावध पवित्रा घेतला जात आहे.

- राजेश शेगोकारअकोला: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मोर्चेबांधणीचे राजकारण आता वेगाने फिरू लागले आहे. काँग्रेस आघाडी, भाजपा-सेना युती व वंचित बहुजन आघाडी, असा तिरंगी सामना प्रत्येक मतदारसंघात सध्यातरी अपेक्षित असून, मुस्लीम व धर्मनिरपेक्ष मतांवर भिस्त ठेवून असलेल्या आघाडी व ‘वंचित’ला एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे. अकोला पश्चिम व बाळापूर या दोन मतदारसंघांतील मुस्लीम मतांची संख्या लक्षात घेता येथे आघाडी व ‘वंचित’मध्ये उमेदवार निश्चितीसाठी सध्या सावध पवित्रा घेतला जात आहे.काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमधील जागा वाटपात पाच मतदारसंघांपैकी मूर्तिजापूरसह अकोला पश्चिम हे दोन मतदारसंघ राष्टÑवादीला देण्यात आल्याची माहिती आहे. या जागा वाटपावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमधील इच्छुक अजूनही आशावादी आहेत. अकोला पश्चिम व बाळापूर या दोन मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतांची संख्या पाहता येथून मुस्लिमांसह मुस्लिमेतर मते मिळविणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याचा प्रयत्न आघाडी व ‘वंचित’कडून होणार आहे. त्यामुळे एका पक्षाने मुस्लीम उमेदवार दिला तर दुसरा पक्ष मुस्लिमेतर उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘वंचित’कडून बाळापुरात डॉ. रहेमान खान यांचे नाव चर्चेत होते; मात्र आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिम राष्टÑवादीकडे आल्याची माहिती समोर येताच वंचितकडून राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी मुस्लीम उमेदवार देण्याच्या मागणीची खेळी समोर आली. ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी तसे पत्रकच काढून डॉ. रहेमान खान यांना अकोला पश्चिममधून उमेदवारी देण्याची मागणी केली. ही मागणी म्हणजे काँग्रेस आघाडीवर दबाब टाकण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे बाळापुरात काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार आल्यास तेथेही नव्या पर्यायाचा विचार वंचितकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र मुस्लिमेतर उमेदवाराला आघाडीने संधी दिली तर वंचित तेथे डॉ. रहेमान खान यांना मैदानात उतरवू शकते, अशी चर्चा आहे.

 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Akolaअकोला