काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

By Admin | Updated: October 8, 2016 03:01 IST2016-10-08T03:01:48+5:302016-10-08T03:01:48+5:30

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्यावतीने अकोल्याच्या दौ-यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.

Congress black flag shown to CM | काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे !

अकोला, दि. 0७-शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्यावतीने अकोल्याच्या दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. स्वराज्य भवन येथे शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी काँग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, रमाकांत खेतान, विष्णू मेहरे, गणेश कटारे, दिनेश शुक्ला, नितीन ताकवाले, राजेंद्र चितलांगे, मनीष नारायणे, जरबीर खान, राजेश पाटील, तपस्सू मानकीकर, निखिलेश दिवेकर, सागर कावरे, पराग कांबळे, सुषमा निचळ, वर्षा बडगुजर, सीमा ठाकरे, साधना गावंडे, रमेश समुद्रे, अभिषेक कोकाटे, कशीश खान, कोपेकर, संगीता आत्राम, विजया राजपूत, हरीश कटारिया, अफरोज लोधी, जावेद खान, शेख बबलू, बब्बू भाई, शारीक भाई, अब्दुल्ला, जितेंद्र बगाटे, मो. जमीर, जितेंद्र शुक्ला, देवीदास सोनोने, तश्‍वर पटेल, मंगेश वानखडे, वीरंगणा भाकरे, जयंत चंग्यारे, धीरज सरोदे, इस्माईल ठेकेदार, स्वप्निल राऊत, हनिफ भाई यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

Web Title: Congress black flag shown to CM