मनपा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:38+5:302021-02-06T04:31:38+5:30
मनपा कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला नाही. कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयाेगाची, तसेच रजा रोखीकरणाची देणी थकीत आहेत. ...

मनपा कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदाेलन
मनपा कर्मचाऱ्यांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला नाही. कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयाेगाची, तसेच रजा रोखीकरणाची देणी थकीत आहेत. यासह कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाकडून कानाडाेळा केला जात असल्यामुळे गुरुवारी काँग्रेसचे गटनेता साजीद खान यांनी मनपासमाेर एकदिवसीय धरणे आंदाेलनाचे आयाेजन केले हाेते. मनपात सेवा बजावताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती द्यावी, मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री खान मोहम्मद अजहर हुसैन, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, रमाकांत खेतान, प्रकाश तायडे, निखिलेश दिवेकर, अविनाश देशमुख, नगरसेवक डाॅ. जिशान हुसेन, पराग कांबळे, मोहम्मद इरफान अ. रहेमान, ॲड. मोहम्मद इक्बाल सिद्दीकी, फिरोज खान, मोहम्मद नौशाद शेख युसूफ, नगरसेविका चांदणी शिंदे, विभा राऊत, जैनबबी शेख इब्राहिम, अख्तरबी शेख हनीफ, अजरा नसरीन मकसूद खान, सुवर्णरेखा जाधव, रवी शिंदे यासह मनपातील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.
...फाेटाे टाेलेजी...