शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात दोन गटांत संघर्ष; एकाचा मृत्यू; जुन्या शहरात संचारबंदी; तणावपूर्ण शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:16 IST

रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले.

अकोला : सोशल मीडियावरील पोस्टवरून जुन्या शहरात दोन गटात संघर्षाचा भडका उडून त्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. जुने शहर भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून, तणावपूर्ण शांतता आहे. 

रविवारी प्रशासनाने सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक घेतली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिले. बैठकीला जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, नागपूर पोलिस उपायुक्त राकेश कलासागर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. संचारबंदीमुळे मुख्य बाजारपेठ बंद होती, तसेच रस्त्यांवर शुकशुकाट हाेता.

शनिवारी रात्री काही वस्त्यांमध्ये असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून जाळपोळ केली. ८ ते ९ घरांची नासधूस करीत, १५ दुचाकी जाळल्या. तसेच ९ चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वाहनमालकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी दिली.

मृताच्या नातेवाइकांना ४ लाखमृताच्या नातेवाईकांना राज्य शासनामार्फत ४ लाखांची मदत मंत्री गिरीश महाजन यांनी घोषित केली. 

३०० जणांवर गुन्हे, ३० जणांना अटकपोलिसांनी दगडफेक, हाणामारी, जाळपोळ प्रकरणात दोन्ही गटातील ३०० ते ३५० असामाजिक तत्त्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, शनिवार रात्रभरापासून ते दुपारपर्यंत पोलिसांनी ३० जणांना अटक केली असल्याचे ठाणेदार वानखडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस