शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कपाशीच्या मदतीसाठी आता ‘पीक कापणी प्रयोगा’ची अट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:26 AM

अकोला :  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना,  २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार,  पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनाच आता कपाशीची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानाला मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना,  २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार,  पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनाच आता कपाशीची मदत मिळणार आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून,  कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या  सातही तालुक्यांत १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्‍यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टर ९९ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक  शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १३५ कोटी ९१ लाख ९0 हजार १५0 रुपये निधीची मागणीही अहवालात करण्यात आली. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्यासंदर्भात शासनाच्या २३ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ६ हजार ८00 रुपये आणि बागायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५00 रुपये दोन हेक्टर र्मयादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे; परंतु बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या शेतकर्‍यांचे कापूस पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाने, अशाच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कपाशी देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचे आढळून आलेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्यात येणार नाही,  अशी अट शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे कपाशी पिकाच्या नुकसान भरपाईपोटी मदतीसाठी बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना आता पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानाची अट पूर्ण करावी लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस