काँक्रिट रस्त्याचे काम रखडले, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST2021-06-25T04:14:58+5:302021-06-25T04:14:58+5:30
मंजूर झालेल्या कामाचे बांधकाम, खडीकरण अर्धवट झाले आहे. बसस्टॉपवरील खडीकरण उखडले असून, बारीक दगड वाहनांच्या चाकांमध्ये ...

काँक्रिट रस्त्याचे काम रखडले, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मंजूर झालेल्या कामाचे बांधकाम, खडीकरण अर्धवट झाले आहे. बसस्टॉपवरील खडीकरण उखडले असून, बारीक दगड वाहनांच्या चाकांमध्ये येऊन वाहनांचे नुकसान होत आहे. दगडांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काँक्रिट रस्त्याचे बांधकाम लवकर मार्गी लागावे. यासंदर्भात १० जून रोजी शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन काही दिवसातच बांधकाम साहित्य आणण्यात आले आहे. २० जून पासून रस्ता बांधकामास सुरुवात करू, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही बांधकाम सुरू करण्यात आले नाही. बांधकामास सुरूवात झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शिवसेना तालुका उपप्रमुख गोपाल विखे यांनी दिला आहे.
बांधकामाची तक्रार वरिष्ठ कार्यालयास प्राप्त झाली असल्याचे कळाले. बांधकाम का थांबले याची चौकशी करून रस्त्याचे बांधकाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
-एस.एन.बोचे, उपविभागीय अभियंता तेल्हारा