दुभाजकाचे काम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:38+5:302021-01-13T04:46:38+5:30
अकोला : टिळक मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर अद्यापही दुभाजक लावण्यात आले नाही, त्यामुळे या मार्गावरील दुभाजकाचे ...

दुभाजकाचे काम पूर्ण करा
अकोला : टिळक मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर अद्यापही दुभाजक लावण्यात आले नाही, त्यामुळे या मार्गावरील दुभाजकाचे काम पूर्ण करण्याची मागणी विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्सचे मानद सचिव विवेक दालमिया यांनी महापाैरांकडे केली आहे.
जलवाहिनी टाकून नळ जोडणी द्या
अकोला: जगजीवन चाैक ते मोचीपुरा या भागात अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकून नागरिकांना नळ जोडणी देण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे उत्तर मंडळ अध्यक्ष शंकर जयराज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापाैर अर्चना म्हसने यांच्याकडे केली आहे.
मो मोबीन अ. लतीफ यांना पुरस्कार
अकोला: मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. ६ येथील कार्यरत शिक्षक मो. मोबीन अ. लतीफ यांना मनपा शिक्षक संघातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
लोकशाही दिनाला कोरोना नियमावली
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी होणारा लोकशाही दिन कोरोनाचे नियम पाडून मर्यादित उपस्थितीत घेण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या आहे. सोमवार ११ जानेवारी रोजी होणार लोकशाही दिन याच नियमामध्ये घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
रेल्वे तिकीट परताव्याला मुदत वाढ
अकोला: २१ मार्च ते ३१ जुलै या कालावधील रेल्वेची आरक्षित तिकिटे रद्द करण्यासाठी तसेच परतावा मिळण्यासाठी ९ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ प्रवासाच्या दिवसात असून, ६ महिने होती ती आता वाढली आहे.
गोरक्षणमध्ये मकरसंक्रांत
अकोला: गोरक्षण संस्थेत मकरसंक्रांत उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवादरम्यान गोप्रेमींनी गोरक्षणमधील गो मातांना चारा, वैरण, पालेभाज्या, चुरी ढेप भरवण्याची व्यवस्था तसेच तुलादानची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती गोरक्षण संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.