तक्रार पुस्तिका नसल्याने भिंतीवर लिहिली तक्रार
By Admin | Updated: June 17, 2017 01:06 IST2017-06-17T01:06:03+5:302017-06-17T01:06:03+5:30
कुरुम वीज वितरण शाखा कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून, तक्रार पुस्तिका नसल्याने ग्राहकाने चक्क भिंतीवर तक्रार मांडल्याचा प्रकार समोर आला आहे.

तक्रार पुस्तिका नसल्याने भिंतीवर लिहिली तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुम : उपविभागीय महावितरण कार्यालय मूर्तिजापूर अंतर्गत येत असलेल्या कुरुम वीज वितरण शाखा कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून, ग्राहकांना विजेबाबत काही समस्या, अडीअडचणी असल्यास त्या मांडण्यासाठी तक्रार पुस्तिका नसल्याने ग्राहकाने चक्क भिंतीवर तक्रार मांडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महावितरण कार्यालयात ग्राहकांना विजेबाबत काही समस्या, अडीअडचणी मांडायच्या असल्यास त्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या तक्रार पुस्तिकामध्ये मांडण्यात येतात; परंतु कुरुम येथील वीज वितरण कार्यालयात गत काही दिवसांपासून तक्रार पुस्तिका नसल्याने ग्राहकांना विजेबाबत तक्रार कुठे मांडायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिक वीज वितरण कार्यालयात एक कनिष्ठ अभियंता व चार कर्मचारी कार्यरत आहे खरे; परंतु अभियंतासह वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तक्रारीबाबत असाच एक प्रकार समोर आला आहे. एक ग्राहक तक्रार देण्यासाठी महावितरण कार्यालयात ३१ मे रोजी आला असता तक्रार पुस्तिका नसल्याने ग्राहकाने चक्क भिंतीवर भागवत डी.पी.चा वायर तुटला आहे, अशी तक्रार मांडली आहे.
मंगळवार, १३ जून रोजी १४ दिवस पूर्ण होऊनही तक्रार पुस्तिका नसल्याने ग्राहकांनी तक्रार देण्यासाठी कुठे जावे, असा प्रश्न निर्माण होत आहे.