वाडेगाव येथील ‘हायटेंशन लाइन’ टॉवरग्रस्त शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:41 IST2018-03-27T17:37:22+5:302018-03-27T17:41:23+5:30
अकोला : महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या अतीउच्चदाब विद्युत वाहिनीच्या (हायटेंशन लाईन)टॉवरमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

वाडेगाव येथील ‘हायटेंशन लाइन’ टॉवरग्रस्त शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!
अकोला : महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या अतीउच्चदाब विद्युत वाहिनीच्या (हायटेंशन लाईन)टॉवरमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
दिनांक ३१मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार व आम्हाला मिळणाऱ्या पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम सुद्धा देण्यात यावी अशी मागणी करत युवा सेना जिल्हा प्रमुक विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले. नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा शेतकºयांनी दिला. निवेदनावर दीपक सरप,किसन गव्हाळे,जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिळा सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर, गुलाम मोईन, अरुण मसने, वासुदेव सरप, श्रीराम हाडोळे,मंगेश धनोकार, केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धमार्ळे, महेबूब खान, विलास मानकर,जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसन गव्हाळे,पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप, नारायण उमाळे, कमला बाई खोडके,रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप, शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकर्णा बाई ढोरे, शेख सादिक, तोताराम धमार्ळे, दुर्गाबाई भटकर, संजय कातखेडे, सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे, नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे,वैभव धर्माळे आदी शेतकºयांच्या स्वाक्षरी आहेत.