शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेविकेच्या अपात्रता प्रस्तावाला आयुक्तांची मंजुरी

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

अवैध बांधकाम प्रकरणात अकोला मनपातील कॉग्रेस नगरसेविका दोषी.

अकोला : काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी उभारलेले बांधकाम अवैध असल्याचा मुद्दा ग्राह्य धरत त्यांच्या नगरसेविका पदाच्या अपात्रता प्रस्तावाला मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंजुरी दिली. हा विषय अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. प्रभाग क्र. १३ मधील नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी युसूफ सुकीवाले यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे करण्यात आली. मनकर्णा प्लॉटमधील नझुल प्लॉट क्र. १५, नझुल शिट क्र.३७ बी येथे मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुषंगाने नगररचना विभागाच्यावतीने इमारतीचे मोजमाप घेण्यात आले असता, एकूण इमारतीमध्ये १२७.0५ चौरस मीटर अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले. इमारतीच्या तिसर्‍या माळ्य़ाचे बांधकाम पूर्णत: विनापरवानगी असल्याचा शेरा नगर रचना विभागाने दिला. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी सुनावणी घेतली. निष्कर्षाअंती नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांच्या अपात्रता प्रस्तावाला डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंजूरी देत, या विषयाला अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेसमोर मांडण्याचे निर्देश नगर सचिव कार्यालयाला दिले आहेत. सभागृहाच्या निर्णयानंतर हा प्रस्ताव न्यायालयात ठेवला जाईल.