शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

ई-वे बिलिंगसाठी जीएसटी कार्यालयाकडून राज्यात रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:50 AM

अकोला : राज्यात १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलिंगची रंगीत तालीम जीएसटी कार्यालयांकडून राज्यभरात सुरू झाली आहे. मालाची आंतरराज्यीय दळण-वळण करीत असलेल्या  विक्रेता, करदात्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून हा प्रयोग केला जात असून, डीलर आणि वाहतूकदारांनी त्यादरम्यान नोंदणी करून यंत्रणा समजून घ्यावी, असे आवाहन मुंबई बॉर्डर चेक पोस्टचे राज्याचे कर सह आयुक्तांनी केले आहे. 

ठळक मुद्देविक्रेता, करदाते आणि वाहतूकदारांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात १ फेब्रुवारीपासून लागू होत असलेल्या ई-वे बिलिंगची रंगीत तालीम जीएसटी कार्यालयांकडून राज्यभरात सुरू झाली आहे. मालाची आंतरराज्यीय दळण-वळण करीत असलेल्या  विक्रेता, करदात्यांना काही अडचणी येऊ नये म्हणून हा प्रयोग केला जात असून, डीलर आणि वाहतूकदारांनी त्यादरम्यान नोंदणी करून यंत्रणा समजून घ्यावी, असे आवाहन मुंबई बॉर्डर चेक पोस्टचे राज्याचे कर सह आयुक्तांनी केले आहे. संपूर्ण देशात फेब्रुवारीपासून ई-वे बिलिंग प्रणाली सुरू होत आहे. त्यासाठी राज्याच्या जीएसटी कार्यालयाच्यावतीने आंतर राज्यीय यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. लवकरच राज्यही त्या दिशेने सक्षम होत आहे. १ फेब्रुवारीच्या आत कधीही तशी सूचना राज्याच्या जीएसटी कार्यालयाकडून येऊ शकते. त्यामुळे राज्याच्या जीएसटी कार्यालयाच्यावतीने प्रयोगिक तत्त्वावर १६ ते ३१ जानेवारीदरम्यान राज्यात ई-वे बिलिंगच्या अंमलबजावणीची रंगीत तालीम सुरू केली आहे. त्यासाठी ई-वे बिलिंगचे वितरणही सुरू झाले आहे. मात्र, ते ट्रायल बेसीसवर आहेत. महाराष्ट्र वस्तू आणि सेवेच्या कर प्रणालीच्या नियमावलीत सहा बदल यानिमित्ताने करण्यात आले आहेत. त्याबाबतची संपूर्ण माहिती जीएसटी पोर्टल आणि एनआयसीच्या साईटवर जाहीर केली गेली आहे. दरम्यान, डीलर, करदाते आणि वाहतूकदारांसाठी राज्यात हेल्प डेस्क उघडण्यात आले आहे. सोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ज्या वाहतूकदारांनी ई-वे बिलिंगची नोंदणी केली नसेल, त्यांनी यादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहनही जीएसटीच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :GSTजीएसटीAkola cityअकोला शहर