शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अकोल्यात कॉलेजातील वर्गमैत्रिणीने केली बदनामी, मुलीने घेतला गळफास

By नितिन गव्हाळे | Updated: August 14, 2023 17:36 IST

हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिकत होती.

अकोला - सोबत कॉलेजात शिकणाऱ्या मैत्रिणीची प्रकृती बिघडल्याने, ती मावस मामासोबत घरी गेली. परंतु तिच्या मैत्रिणीने खातरजमा न करताच, वर्ग मैत्रिणीने तिची बदमानी केली. याबाबत पीडित मुलीने जाब विचारला असता, तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप हिवरखेड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यानंतरही तिची बदनामी सुरू असल्याने, अखेर मुलीने घरात गळफास घेत, जीवनयात्राच समाप्त केली. याप्रकरणात हिवरखेड पोलिसांनी वर्गमैत्रिणीसह तिच्या दोन आजींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिकत होती. मुलगी दोन मैत्रिणींसोबतच पायी कॉलेजात जायची. २८ जुलै रोजी त्यांची मुलगी मैत्रिणींसह कॉलेजला गेली होती. परंतु तिची प्रकृती बिघडल्याने, कॉलेजातील शिक्षकांनी घरी फोन करून माहिती दिली. त्यामुळे तिचा मावसा मामा तिला घ्यायला कॉलेजात गेला. त्याच्या दुचाकीवर बसवून मुलगी घरी आली. परंतु तिच्यासोबत कॉलेजात शिकणाऱ्या व गावातील मैत्रिणीने तिची कॉलेजात बदनामी केली. एवढेच नाहीतर ही बाब आजी दुर्गा बापुराव सपकाळ व आजीची बहिण विमल मधुकर परघरमोर यांनाही सांगितली. त्यांनीही शहानिशा न करता, मुलीची गावात बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

२९ जुलै आरोपी मुलगी व तिच्या आजी दुर्गाबाई व आजीची बहिण विमलबाई यांनी पीडित मुलीच्या घरी येऊन तिला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिची समजूत काढली आणि १ ऑगस्ट रोजी शेतावर निघुन केली. त्यानंतर सायंकाळी घरी परत आल्यावर पीडित मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिची मैत्रिण व मैत्रिणीच्या आजी दुर्गा बापुराव सपकाळ व आजीची बहिण विमल मधुकर परघरमोर यांनीच पीडित मुलीची बदनामी केल्याने, तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

आठ दिवसांनंतर गुन्हा दाखल

प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता, हिवरखेड पोलिसांनी पीडित मुलीच्या आईवडिलांसह मावस मामा, काका आणि शिक्षकांचा जबाब नोंदविल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला असता, गावातील अल्पवयीन मुलगी व तिच्या आजी दुर्गा बापुराव सपकाळ, विमल मधुकर परघरमोर यांनी पीडित मुलीची बदनामी केल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन्ही आजींविरूद्ध भादंवि कलम ३०५, ३२३, ५०४(३४) नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Akolaअकोला