योजनांच्या अंमलबजावणी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:26+5:302021-02-05T06:16:26+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी ...

The Collector reviewed the implementation of the schemes | योजनांच्या अंमलबजावणी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

योजनांच्या अंमलबजावणी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पवनकुमार कछोट, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, नगरपालिका प्रशासन अधिकारी सुप्रिया टवलारे तसेच जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला. त्याअंतर्गत पंडित दिनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमणे नियमानुकूल करणे योजना, महाआवास ग्रामीण अभियान, पंतप्रधान आवास योजना - शहरी व ग्रामीण, आदिवासी पुनर्वसन गाव घरकुल वाटप योजना, माझी वसुंधरा अभियान, नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत यंत्रणानिहाय आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे मग्रारोहयोअंतर्गत अभिसरणातून विकासकामांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रोहयोअंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. विविध संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे व लाभार्थ्यांच्या अंतिम निवडसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

Web Title: The Collector reviewed the implementation of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.