जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत दिला आश्चर्याचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 14:21 IST2018-12-15T14:18:03+5:302018-12-15T14:21:57+5:30

अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील महसूल विभागाच्या एका क्रिकेट सामन्यात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

collector playing cricket with a two-wheeler helmet and gave a surprise | जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत दिला आश्चर्याचा धक्का

जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत दिला आश्चर्याचा धक्का

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यातून त्यांना कोणता संदेश तर द्यायचा नव्हता ना! अशी चर्चा मैदानावर रंगली होती.

अकोला: अकोला क्रिकेट क्लब मैदानावरील महसूल विभागाच्या एका क्रिकेट सामन्यात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी क्रिकेटमधील नव्हे, तर चक्क दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर आहे. गत काही महिन्यांपूर्वी आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांमध्ये त्यांनी चौकार व षट्कार लगावत अर्धशतकसुद्धा झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. क्रिकेट क्लब मैदानावरील सामन्यात जिल्हाधिकारी पाण्डेय फलंदाजीला उतरले. तेव्हा त्यांनी डोक्यावर क्रिकेटमधील नव्हे, तर दुचाकीवरील हेल्मेट चढविले होते. त्यांना दुचाकीवरील हेल्मेट घालून क्रिकेट खेळताना पाहून, सर्वांनाच आश्चर्य वाटले. क्रिकेटमधील हेल्मेट सोडून दुचाकीवरील हेल्मेटचा जिल्हाधिकाºयांनी वापर कसा काय केला, यातून त्यांना कोणता संदेश तर द्यायचा नव्हता ना! अशी चर्चा मैदानावर रंगली होती.

Web Title: collector playing cricket with a two-wheeler helmet and gave a surprise