शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण : अकोटात तीन एसटी बसेसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:55 IST

अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

ठळक मुद्देतीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना

अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हिवरखेड मार्गावर सिरसोली येथून अकोटकडे एमएच ४0 - ८६३४ क्रमांकाची एसटी बस येत असताना अज्ञात दोन इसमांनी बसवर दगडफेक केली. त्यामध्ये एसटी वाहक प्रभाकर येवले यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले, तर एसटीच्या काचा फुटल्या. दुसर्‍या घटनेत अकोट-अकोला मार्गावरील तांदूळवाडी फाट्यावर अज्ञात इसमांनी एमएच ४0 एन ९१२४ क्रमांकाच्या एसटी बसवर दगडफेक करून एसटीच्या समोरील काचा फोडल्या. त्यामध्ये दहा हजारांचे नुकसान झाले. या घटनेत अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३३६, ३३७, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, तर अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील सती मैदानाजवळ अज्ञात तीन इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एमएच ४0 एन ८९६१ क्रमांकाची एसटी बस परतवाडा येथे प्रवासी घेऊन जात असताना वाहनासमोर येऊन दगडफेक केली. त्यामध्ये एसटीचे नुकसान झाले. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांत भादंवि ३३६, ४२७, ३४२ कलमान्वये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनुचित प्रकार घडू नये, याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सी.टी. इंगळे, शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर व पोलीस, महसूल यंत्रणा लक्ष ठेवून असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदनअकोट - शौर्य दिनानिमित्य कोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार यांना २ जानेवारी रोजी अकोट तालुका भारिप बमसंच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये समाजकंटकांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन तालुका अध्यक्ष संदिप आग्रे, तालुका सचिव डॉ.संतोष गायगोले, जिल्हा उपाध्यक्ष संजय पुंडकर, शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे,  निजामोद्दीन नाजीमोद्दीन, जम्मूभाई, रवि ओहेकर, पंजाबराव पाचपाटील,  सदानंद तेलगोटे यांच्यासह भारिप बमसं व अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले. 

आज अकोट शहर बंद  कोरेगाव  भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ आकोट तालुका भारिप बमसं महासंघ शहर व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने ३ जानेवारी रोजी अकोट बंद  ठेवण्यात  येणार आहे. याबाबत आकोट शहर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून आकोट बंद मध्ये सर्व व्यापारी बंधूनी सहभाग द्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष संदिप आग्रे, तालुका महासचिव डॉ.संतोष गायगोले यांनी केले आहे. 

टॅग्स :akotअकोटBhima-koregaonभीमा-कोरेगाव