वृद्धेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा
By Admin | Updated: June 5, 2014 01:32 IST2014-06-05T00:26:08+5:302014-06-05T01:32:06+5:30
अकोला वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून वृद्धेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा

वृद्धेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा
अकोला : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील ६५ वर्षीय महिलेच्या पोटातील तब्बल साडेतीन किलोचा गोळा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात करण्यात आली. शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेचे प्राण वाचविले. अंदुरा येथील रहिवासी जनाबाई सोनोने (६५) या वृद्धेच्या पोटात मागील एका वर्षापासून ओव्हरेन्सिस्ट (अंडकोष) चा तब्बल साडेतीन किलोचा गोळा झाला होता. जनाबाईला पोटातील या गोळयाचा प्रचंड त्रास असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जनाबाईच्या सर्व तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया विभागा तील डॉक्टरांनी त्यांच्यावर बुधवारी यशस्वी शस्त्रक्रिया करून पोटातील साडेतीन किलोचा गोळा काढला. पोटात एक गाठ निर्माण होऊन त्यापासून हा गोळा तयार झाला होता. दिवसेंदिवस या गोळयाचा आकार वाढत असल्याने जनाबाईंच्या त्रासातही वाढ होत होती. ६५ वर्षांच्या असलेल्या जनाबाईंच्या पोटातील हा गोळा तब्बल साडेतीन किलोंच्यावर गेल्याने त्यांना प्रचंड त्रास हो त होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने जनाबाईंना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात दा खल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी तपासण्या केल्यानंतर त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करून पोटातील तब्बल साडेतीन किलोचा गोळा काढला. यामुळे जनाबाईंच्या वेदना कमी झाल्या असून, त्यांच्या जीवाला असलेला धोका आता राहिला नाही. पोटातील गोळा वाढला असता तर जनाबाईंच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र आता त्यांना कुठलाही धोका नसल्याचे येथील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. जनाबाईंवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अवनीश देशमुख, डॉ. सागर थोते, डॉ. कोरडे व त्यांच्या चमूने परिश्रम घेऊन शस्त्रक्रिया केली.