चिखलगाव येथे गोठय़ाला आग

By Admin | Updated: April 8, 2017 17:47 IST2017-04-08T17:47:17+5:302017-04-08T17:47:17+5:30

चिखलगाव येथील शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक लाख रुपयांचे नुकसान झाले.

Cold fire in Chikhgalgaon | चिखलगाव येथे गोठय़ाला आग

चिखलगाव येथे गोठय़ाला आग

चिखलगाव (जि. अकोला): येथील शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एक लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली.
गावातील जगदेव रामकृष्ण चव्हाण यांच्या शेतात गोठा आहे. या गोठय़ाजवळच कृषी पंपासाठी वीजपुरवठा घेतलेला आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता वीज पुरवठा सुरु झाल्याने शार्ट सर्किट होउन गोठय़ाला आग लागली.या आगीत कुटार, ठिबक सिंचन व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे, चव्हाण यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. (

Web Title: Cold fire in Chikhgalgaon