गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा रुळांवरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:19 IST2021-03-10T04:19:09+5:302021-03-10T04:19:09+5:30

हावडाहून मुंबईकडे जाणारी ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्यान काटेपूर्णा ते बोरगाव ...

A coach of Gitanjali Express derailed; No casualties | गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा रुळांवरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही

गीतांजली एक्स्प्रेसचा एक डबा रुळांवरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही

हावडाहून मुंबईकडे जाणारी ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी आपल्या नियमित वेळेवर धावत असताना सकाळी ११.१५ वाजण्याच्या दरम्यान काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली असता, या गाडीचा शेवटचा डबा (एसएलआर) अचानक रुळांवरून घसरला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने वेग नियंत्रित करीत गाडी थांबविली. ताेपर्यंत सुदैवाने डबा उलटला नव्हता. मोठा आवाज झाल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. रुळांवरून घसरलेला डबा डाऊन लाईनपर्यंत गेल्याने दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. रेल्वेचे अधिकारी व रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे प्रशासनाने तातडीने तुटलेला लोहमार्ग दुरुस्त करीत घसरलेला डबा गाडीपासून वेगळा केला. दुरुस्तीचे कार्य सुरू असेपर्यंत दोन्ही बाजूंची रेल्वे वाहतूक थांबविण्यात आली होती. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी गाडी पुढील प्रवासाकरिता रवाना करण्यात आली.

Web Title: A coach of Gitanjali Express derailed; No casualties