शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात महापालिकेच्या २४ शाळा बंद; पटसंख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:53 IST

अकोला: शिकस्त इमारती, स्वच्छतागृहातील अस्वच्छता, मध्यान्ह भोजनाचा उडालेला बोजवारा व अपुऱ्या मैदानांमुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचे चित्र आहे.

- आशिष गावंडे

अकोला: शिकस्त इमारती, स्वच्छतागृहातील अस्वच्छता, मध्यान्ह भोजनाचा उडालेला बोजवारा व अपुऱ्या मैदानांमुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचे चित्र आहे. परिणामी मागील पाच वर्षात महापालिकेच्या २४ शाळा बंद पडल्या असून, यामध्ये सर्वाधिक मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. सद्यस्थितीत केवळ ३३ शाळा सुरू आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात खासगी शाळांची संख्या वाढल्याचा परिणाम महापालिकेच्या शाळांवर होत असून, यासंदर्भात मनपा प्रशासनाने तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.मनपा शाळांमध्ये गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. मराठी आणि हिंदी माध्यमातील शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही परिस्थिती २० वर्षांपूर्वी नव्हती. कधीकाळी महापालिक ा शाळांमधून दर्जेदार शिक्षण घेऊन सरकारी सेवांमध्ये उच्च पदांवर जाणाऱ्यांची मोठी संख्या होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक वर्ग अपार मेहनत घेत होते. खासगी शाळांचे पेव फुटले नसल्यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम होती. वर्तमान स्थिती लक्षात घेता मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत. इमारतींची दुरवस्था झाली असून, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वर्ग खोल्यांमध्ये लाइट, पंख्यांचा अभाव आहे. या सर्व सुविधा पुरविण्यासाठी तसेच दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्यामुळे उर्दू माध्यमाच्या तुलनेत मराठी आणि हिंदी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे.आता शिक्षकांचीच कसोटी!मराठी माध्यमाच्या शिक्षकांची उदासीनता, अंतर्गत राजकारणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये ५७ शाळांपैकी तब्बल २४ शाळांचे समायोजन करण्यात आले. आजरोजी ३३ शाळा असून, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घसरण होत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मराठी शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागेल, असे चिन्ह आहे.एकूण शाळा आणि पटसंख्यामराठी माध्यम- १३ शाळाउर्दू माध्यम -१४ शाळाहिंदी माध्यम- ६ शाळाएकूण विद्यार्थी- ७,०१४मराठी, हिंदी माध्यम पटसंख्या- ३,०७३उर्दू माध्यम पटसंख्या- ३,९४१

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाSchoolशाळा