सफाई कर्मचार्‍यांनी उपसले संपाचे हत्यार

By Admin | Updated: June 1, 2014 00:55 IST2014-06-01T00:48:28+5:302014-06-01T00:55:09+5:30

अकोला मनपा सफाई कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.

Cleansing staff | सफाई कर्मचार्‍यांनी उपसले संपाचे हत्यार

सफाई कर्मचार्‍यांनी उपसले संपाचे हत्यार

अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्याच्या मुद्यावरून मनपा सफाई कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले. मात्र संप पुकारण्याआधीच या विषयावर मनपा कर्मचारी संघर्ष समितीमध्ये उभी फूट पडली आहे. तर प्रशासनाची आर्थिक स्थिती माहीत असताना, वेठीस धरण्यापेक्षा सहकार्य करण्याची भूमिका मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी मांडली आहे. अकोलेकरांजवळून वसूल केल्या जाणार्‍या कर रकमेतून कंत्राटदारांची थकीत देयके अदा क रून मनपाची तिजोरी खिळखिळी करणार्‍या उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांच्या उदार धोरणाचे परिणाम समोर येत आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडूनसुद्धा वेतनाची समस्या निकाली काढण्यासाठी निधी मिळेनासा झाल्याने थकीत वेतनाच्या मुद्यावर कर्मचार्‍यांमध्ये संताप व संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. एकीकडे वेतन अदा करण्यासाठी कंत्राटदारांच्या देयकांना नकार देत आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर वेतनाची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याची वस्तुस्थिती आहे तर दुसरीकडे नेमक्या याच मुद्यावर संपाच्या माध्यमातून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष पी.बी.भातकुले यांनी प्रशासनाला ४ जून रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला, मात्र या मुद्यावर मनपातील इतर संघटनांना विश्‍वासात न घेण्यावरून मनपा कर्मचारी संघर्ष समितीमध्ये फूट निर्माण झाली आहे.

Web Title: Cleansing staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.