अकोला शहरात साफसफाईच्या कामाची ऐशीतैशी; नाल्या-गटारे तुंबली; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:37 IST2018-02-07T13:33:13+5:302018-02-07T13:37:45+5:30

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

cleanliness works fiasco in the Akola city | अकोला शहरात साफसफाईच्या कामाची ऐशीतैशी; नाल्या-गटारे तुंबली; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात

अकोला शहरात साफसफाईच्या कामाची ऐशीतैशी; नाल्या-गटारे तुंबली; अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात

ठळक मुद्देसाफसफाईसंदर्भात आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रशासकीय प्रभागांसह पडीत प्रभागांची अवस्था अत्यंत केविलवाणी असून, नागरिकांच्या हिताचा आव आणणारे महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि नगरसेवक आहेत तरी कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. साफसफाईसंदर्भात आरोग्य विभागाचा गलथान कारभार पाहता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’वर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अकोलेकरांना साफसफाई, पथदिवे, पाणी पुरवठा, रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. मनपाच्या आस्थापनेवर ७४८ सफाई कर्मचारी असून, त्यांची प्रशासकीय प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, बहुतांश कर्मचाºयांना जाणीवपूर्वक कार्यालयांमध्ये नियुक्त केले आहे, तर २३ प्रभागांमध्ये (पडीत) खासगी तत्त्वावर प्रत्येकी १५ सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पडीत प्रभागांमध्ये १५ पैकी केवळ ४ ते ५ खासगी कर्मचाºयांच्या माध्यमातून केवळ सर्व्हिस लाइनची स्वच्छता करण्याचे काम केले जाते. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवक किंवा त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी मिळविले आहे. यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा, बाजारपेठ, खुली मैदाने तसेच प्रभागांमध्ये दैनंदिन साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रभागात पंधरा-पंधरा दिवस सफाई कर्मचारी फिरकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी काटेरी झुडुपे वाढली असून, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. प्रभागांमधील साफसफाईची जबाबदारी क्षेत्रीय अधिकाºयांची असली, तरी प्रभागांमधील चित्र पाहता, क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि संबंधित नगरसेवकांच्या कार्यशैलीवर अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

आरोग्य निरीक्षक नव्हे, पांढरे हत्ती!
प्रभागातील दैनंदिन साफसफाईची पाहणी करून तसा अहवाल क्षेत्रीय अधिकाºयांकडे सादर करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश आरोग्य निरीक्षक नगरसेवकांच्या इशाºयानुसार काम करतात. शहरात स्वच्छतेची समस्या लक्षात घेता, आरोग्य निरीक्षक पांढरे हत्ती बनल्याचे चित्र आहे. प्रभागांमध्ये घाण, अस्वच्छता आढळून आल्यास आरोग्य निरीक्षकांचे वेतन कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: cleanliness works fiasco in the Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.