शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
2
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
3
दिल्ली महापालिकेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लागला; भाजपाच्या २ जागा घटल्या, काँग्रेसला फायदा
4
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
5
मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
6
तुटलेले दात, चॉकलेट अन् मृतदेह; लाल सुटकेसमध्ये होता ८ वर्षीय चिमुकला, उघडताच उडाला थरकाप
7
राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये प्रशिक्षणादरम्यान इंदिरा गांधी कालव्यात लष्कराचा टँक बुडाला; एका जवानाचा मृत्यू
8
सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
9
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
10
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
11
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
12
अखेर केडीएमसीने मॅनहोलमध्ये पडलेेल्या 'त्या' मुलाच्या मृत्युची जबाबदारी घेतली, पालकांना देणार सहा लाख
13
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
14
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
15
हवा कुठे, किती खराब? अचूक माहिती मिळणार; BMC हवा गुणवत्ता मोजण्यासाठी ‘मानस’ उपक्रम राबवणार
16
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
17
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
18
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
19
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
20
Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानातून सर्वोपचार रुग्णालय चकचकीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:52 IST

रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय परिसरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या अभियानानंतर सर्वोपचार रुग्णालय परिसरासोबतच वॉर्डदेखील चकचकीत झाले. या मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.सर्वोपचार रुग्णालयात रविवारी सकाळी ९.३० वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी ना. संजय धोत्रे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसद, महापौर अर्चना मसने, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हा भाजपा अध्यक्ष तेजराव थोरात यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी ना. धोत्रे यांनी उपस्थितांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, डॉक्टर व कर्मचाºयांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत रुग्णालय परिसरात स्वच्छतेला सुरुवात केली. बालरुग्ण वॉर्ड परिसर, समता लॉन, जीवनदायी योजना कार्यालय परिसर,अपघात कक्ष परिसरात ही मोहीम राबविण्यात आल्याने रुग्णालयातील दर्शनी भाग स्वच्छ दिसून आला. शिवाय रुग्णालयातील विविध वॉर्डातही स्वच्छता करण्यात आल्याने ऐरवी अस्वच्छ दिसणारे सर्वोपचार रुग्णालय रविवारी चकचकीत दिसून आले. मोहिमेत हरीश आलिमचंदानी, वैशाली शेळके, आशीष पवित्रकर यांच्यासह इतर नगरसेवक ांचाही सहभाग होता.रुग्ण व रुग्ण नातेवाइकांमध्ये जनजागृतीची गरजरुग्णालयातील स्वच्छता कायम राखण्यासाठी नियमित स्वच्छतेसोबतच रुग्ण व रुग्ण नातेवाइकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. शिवाय प्रत्येक वॉर्डासह रुग्णलय परिसरात कचरा पेट्यांची गरज आहे. असे झाल्यास रुग्णालयातील स्वच्छता कायम राहण्यास मदत होईल.

महिन्यातून एकदा होईल स्वच्छता अभियानसर्वोपचार रुग्णालयात रविवारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वच्छतेची ही मोहीम आता प्रत्येक महिन्यातून एकदा राबविण्यात येणार आहे.

स्वच्छता कायम टिकवून ठेवण्याचे आव्हानमोठ्या उत्साहात सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने रविवारी रुग्णालय परिसर स्वच्छ दिसून आला; मात्र ही स्वच्छता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय प्रशासनासमोर आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयSanjay Dhotreसंजय धोत्रे