शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
7
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
8
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
9
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
10
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
11
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
12
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
13
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
14
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
15
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
16
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
17
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
18
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
19
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
20
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

आयुक्तांच्या आदेशाला सफाई कर्मचार्‍यांचा ठेंगा

By admin | Updated: July 1, 2014 02:23 IST

अकोला जनता भाजी बाजार, जुना कापड बाजारात घाण-कचर्‍याचे ढीग.

अकोला : शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाण तसेच प्रभागातील अंतर्गत साफसफाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नुकत्याच आस्थापनेवरील सफाई कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या. यामध्ये प्रभाग क्र.१५ मध्ये १६ कर्मचार्‍यांना नियुक्तीचे आदेश दिले असले तरी अद्यापपर्यंत एकही कर्मचारी रुजू झाला नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जनता भाजी बाजार, जुना कापड बाजार, नवीन कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार, जुना भाजी बाजार परिसरात अक्षरश: घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत.अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ वसली आहे. प्रभाग क्र. १५ अंतर्गत जुने व नवीन बसस्थानक, जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार, जुना व नवीन कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार, गांधी रोड, टिळक रोड आदी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. परिणामी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कचरा साचतो. मनपाच्या आस्थापनेवरील ७४0 सफाई कर्मचार्‍यांना प्रशासकीय प्रभागात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित २३ पडीत वार्डांमध्ये खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. सफाई कर्मचार्‍यांची उपलब्ध संख्या लक्षात घेता, शहर स्वच्छ असणे क्रमप्राप्त आहे; परंतु धुळीने माखलेले रस्ते, दुभाजकांमध्ये साचलेले मातीचे ढीग व ठिकठिकाणी साचलेला कचरा, असे चित्र पाहावयास मिळते. या बाबीचा अभ्यास केल्यानंतर आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी नुकत्याच आस्थापनेवरील सफाई कर्मचार्‍यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. यामध्ये प्रभाग क्र.१५ मधील ५२ कर्मचार्‍यांना इतरत्र ठिकाणी हलवत त्याबदल्यात १६ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली; परंतु आजपर्यंतही सदर कर्मचारी नियुक्त झाले नसल्याचे समोर आले असून, प्रभागातील मुख्य बाजारपेठेत कचरा व घाणीचे ढीग साचले आहेत.