जुने शहरात दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: March 22, 2016 02:20 IST2016-03-22T02:20:05+5:302016-03-22T02:20:05+5:30

क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल.

Clashes in two groups in the old city | जुने शहरात दोन गटांत हाणामारी

जुने शहरात दोन गटांत हाणामारी

अकोला: जुने शहरातील भगतवाडी येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भगतवाडी येथील रहिवासी मो. रसूल गुलाम दस्तगीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे शेजारी मो. अकील अ. वहाब व त्याचा भाऊ मो. शकील या दोघांनी क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मो. अकील यांनी मो. रसूल गुलाम दस्तगीर यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली. या दोन्ही तक्रारींवरून डाबकी रोड पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणानंतर दोन्ही गटांतील आरोपींनी जाळपोळ केल्याची माहिती आहे.

Web Title: Clashes in two groups in the old city