नागरिकांची पाण्यासाठी भटकंती;सेना नगरसेवकाकडून ताेडफाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST2021-05-18T04:20:24+5:302021-05-18T04:20:24+5:30
हद्दवाढ क्षेत्रात सामील असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मधील मलकापूर परिसरात मागील अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे़ ...

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती;सेना नगरसेवकाकडून ताेडफाेड
हद्दवाढ क्षेत्रात सामील असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मधील मलकापूर परिसरात मागील अनेक दिवसांपासून पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला आहे़ गत महिन्यात भूमिगत फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकणाऱ्या माेबाइल कंपनीने खाेदकामात मनपाची जलवाहिनी फाेडली़ त्यावेळी थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली; परंतु जलवाहिनीत माती शिरल्याने नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा सुरू झाला़ नंतर पाणीपुरवठा बंद झाला़ यासंदर्भात प्रभागाचे नगरसेवक मंगेश काळे यांनी जलप्रदाय विभागाला अनेकदा सूचना व माहिती दिली; परंतु या विभागाकडून हाेणारी चालढकल व नागरिकांचा निर्माण झालेला राेष पाहता साेमवारी मंगेश काळे यांनी जलप्रदाय विभागात ताेडफाेड केली़ त्यानंतर धावपळ करीत जलप्रदाय विभागातील कर्मचारी व कंत्राटदाराने मलकापूर धाव घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीला प्रारंभ केला़
माेबाइल कंपनीला २ लाखांचा दंड
भूमिगत केबलच्या खाेदकामात जलवाहिनी फाेडणाऱ्या माेबाइल कंपनीला जलप्रदाय विभागाने दाेन लाख रुपयांचा दंड बजावल्याची माहिती आहे़ कंपनीने दंडाची रक्कम जमा न केल्यास दक्षिण झाेनमधील काम बंद केल्या जाणार आहे़
मलकापूरवासीयांना मागील २१ दिवसांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध हाेत नव्हते़ याविषयी जलप्रदाय विभागाला अनेक सूचना केल्या़ त्याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने नाइलाजास्तव अप्रिय निर्णय घ्यावा लागला़
- मंगेश काळे, नगरसेवक प्रभाग ४