चिमुकल्या संभाजीने घराचा व्हरंडा बनविला पक्षांचे निवासस्थान
By Admin | Updated: August 23, 2014 23:24 IST2014-08-23T22:15:12+5:302014-08-23T23:24:56+5:30
परसबाग बनली अन्न, पाण्याच्या सोयीचे ठिकाण; सुरक्षेचीही घेतली जाते विशेष काळजी

चिमुकल्या संभाजीने घराचा व्हरंडा बनविला पक्षांचे निवासस्थान
वाशिम - वडीलांचे पक्षीप्रेम पाहून त्यांच्या पावलावर पाउल ठेवत कारंजा शहरातील पत्रकार कॉलनित राहणार्या संभाजी शिवाजीराव देशमुख या चौथीतील चिमुकल्याने आपल्या घराच्या व्हरांड्याला चिउताईंसह विविध पक्षांचे निवासस्थान बनविले आहे. तर आपल्या घरासमोरील परसबागेत त्याने पक्षांच्या अन्न व पाण्याची सोय केली आहे. विशेष म्हणजे पावसापासून संरक्षणाचीही व्यवस्था केली आहे.
उन्हाळ्य़ाच्या दिवसात वर्तमानपत्र अन् दूरचित्रवाणीच्या माध्यमातून पक्षी जीवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले गेले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारंजाच्या पत्रकार कॉलनितील रहिवासी शिवाजीराव देशमुख यांनी आपल्या घराच्या व्हरंड्यात व परसबागेत चार ठिकाणी पक्षांच्या पिण्याच्या पाण्याची व निवासाची सोय करण्याचा निर्णय एप्रील २0१२ मध्ये राबविला. पहिल्याच वर्षी मातिच्या मडक्यांच्या सहाय्याने निर्माण केलेले चारही घरटे दोन दिवसात फूल्ल झाले. त्यामुळे आणखी पक्षांची व्यवस्था म्हणून देशमुखांनी आणखी चार मातीच्या मडक्यांच्या सहाय्याने चार घरट्यांची निर्मीती केली. झाले असे की त्या आठ घरट्यांमुळे कधी नव्हे एवढा त्यांच्या घराचे परिसरात विविध प्रकारच्या पक्षांचा किलबिलाट वाढला. अर्थात चिउताई त्यात संख्येने जास्त होत्या. देशमुखांचे हे कार्य आसपासच्या अनेकांना आवडले. त्यांनी मुलाबाळासह देशमुखांच्या घराला भेट देवून त्यांच्या कार्याचे भरभरुन कौतूक करत आपल्या परिने त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सुरु केला. नेमक पहायला येणार्या व्यक्तीच्या सोबतच परसबागेतील सर्व प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य शिवाजी देशमुखांच्या संभाजी नावाच्या चौथीतील चिमुकल्याला नकळत पक्षीप्रेमाकडे घेवून गेले. वडिलांच्या पक्षीसेवेत मदत करताना संभाजीने वडिलांचे काम कधी आपले करुन घेतले ते कुणाला कळलेच नाही.उन्हाळ्य़ात केलेले घरटे पावसाळ्य़ात स्वच्छ करायला निघालेल्या शिवाजीरावांना जेव्हा त्या घरट्यांमध्ये मैना, सुर्यक्षाची अंडी दिसली. तेव्हा त्यांनी व त्यांच्या मुलाने केवळ उन्हाळ्य़ापूरते हे काम न करता तिनही रुतूत पक्षांची अन्न अन पाण्याची सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी केवळ ८ घरटे निर्माण करणार्या देशमुख पितापुत्रांनी आपल्या घराचे व्हरंड्यात आजमितीला तब्बल २४ घरटे तयार केले असून या पक्षांच्या सोयीसाठी त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था आपल्या परसबागेत केली आहे. त्यांचे पक्षीप्रेम सर्वांसाठी आदर्श असून पक्षांच्या सेवेतून मिळणारा आनंद चिमुकला पक्षीप्रेमी संभाजी देशमुखसह त्याच्या सवंगड्यांना काही तरी निस्वार्थ सेवा आपल्या हातून घडण्याची प्रेरणा देवून जात आहे.
** असे घरटे अशी व्यवस्था.....
घराच्या १४ फुट उंचिच्या व्हरंड्यात व गॅलरीत मातीच्या मडक्यांना गोल आकाराचे छिद्र पाडून त्यावर मातीचेच झाकन लावून ती मडकी ताराने टांगून ठेवली आहेत. व्हरंड्यातील मडक्यांच्या वरील झाकनामध्ये धान्य ठेवले जाते. तर गॅलरित अशाच व्यवस्थेबरोबर पाण्याची वेगळी सोयही करण्यात आली आहे. मातीच्या मडक्यांपासून बनविलेल्या या घरट्यांमूळे चिमन्या व इतर आयत्या जागेत घर करुन राहणार्या पक्षांना उन्हाळ्य़ाच्या दिवसात उष्नतेपासून संरक्षण होण्यास मदत होते.
** देशमुखांच्या परसबागेसह घराचे व्हरंड्यात चिउताई, सुर्य पक्षी यासह सात ते आठ प्रकारच्या पक्षांचा व खारुताईचा मुक्त संचार आहे. खारुताईची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून कधी काळी चिउताईचा आवाज गोष्टींपूरता र्मयादीत असलेला चिमुकला संभाजी आता आपल्या दोस्तांना पक्षांच्या गोष्टी स्वनाभवातून सांगतांना दिसतो आहे. देशमुखांच्या या कार्यातूनच प्रेरणा घेत पत्रकार कालनितीलच माजी सैनिक मधूकर खाडे यांच्या पुढाकारातून कॉलनीतील ओपन स्पेसमध्ये पक्षांसाठी खाद्यांन्न भांडार उघडण्यात आले आहे. या ठिकाणी कॉलनीतील रहिवासी आपल्या घरातील उरलेले पक्षी खाअ शकतील असे अन्न वाया न घालता आणून टाकत पक्षीबचाव कार्यात आपले योगदान देत आहेत.
** मी करीत असलेली पक्षीसेवा पाहून माझा चिमुकला पक्षीप्रेमी कधी झाला मलाही कळले नाही. आता पक्षीसेवेच्या कार्यात त्यांने या वयातच स्वत:ला वाहून घेतले आहे. पक्षांना काय लागत, कधी लागत याची काळजी आता तोच करतो व लागणार्या वस्तू संपायच्या आत मला त्या आणायला लावतो.
- शिवाजी देशमुख