शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडात बळावतेय बालकुपोषण

By admin | Updated: August 4, 2014 20:47 IST

पश्‍चिम वर्‍हाडात जवळपास ३१ हजार ९२१ बालके कुपोषित असून, ४ हजार ५६४ बालके अतिकुपोषित आढळून आले आहेत.

मेहकर: बालकुपोषणाच्या निर्मूलनासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू असल्यातरी कुपोषणाचा आकडा कमी होताना दिसत नाही. पश्‍चिम वर्‍हाडात जवळपास ३१ हजार ९२१ बालके कुपोषित असून, ४ हजार ५६४ बालके अतिकुपोषित आढळून आले आहेत. पश्‍चिम वर्‍हाडात बाल कुपोषण बळावत असल्याने कुपोषण थोपविण्यात यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. बालकांच्या आरोग्यासाठी एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटप करण्यात येतो. त्याचबरोबर बालकुपोषण रोखण्यासाठी शासनदरबारी कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडेच शासनाने ह्यकुपोषण चलेजावह्ण चा नारा दिला आहे. कुपोषण चलेजावच्या माध्यमातून बालकांचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी शासनाने 0 ते ५ वर्ष वयोगटातील बलकांना फळे, अंडे, दूध यासह सकस आहार देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे; मात्र बाल कुपोषण थोपविण्यास ही यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा या आकडेवारीवरून समोर येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात १८ हजार २१४ बालके कुपोषित असून, २ हजार ५१४ बालके अतिकुपोषित आहेत. वाशिम जिल्ह्यात ७ हजार ३९१ बालके कुपोषित असून, १ हजार ७0 बालके अतिकुपोषित आहेत. तसेच अकोला जिल्ह्यात ६ हजार ३१५ बालके कुपोषित असून, ९८0 बालके अतिकुपोषित आहेत. एकूण पश्‍चिम वर्‍हाडात ३१ हजार ९२१ कुपोषित बालके व ४ हजार ५६४ बालके अतिकुपोषित आढळल्याने महिला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बालकांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार वेळेवर मिळतो की नाही ? बालकांना देण्यात येणारा आहार किती प्रमाणात सकस असतो? बालकांची आरोग्य तपासणी होते की नाही ? असे विविध प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष घालून बालकांच्या आरोग्य तपासण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी होत आहे.