शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

बालकांच्या संरक्षणासाठी ‘चाइल्ड लाइन १०९८’ आज अकोल्यात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:00 AM

अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे.

अकोला: महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारद्वारा पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीच्या वतीने अकोल्यात चाइल्ड लाइन १०९८ या हेल्पलाइनचा शुभारंभ होत आहे. उद्घाटन उद्या शनिवार ९ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष सुगत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.चाइल्ड लाइन १०९८ या प्रकल्पाला भारत सरकारची मान्यता आहे. चाइल्ड लाइनबाबत बाल न्यायलय अधिनियम २०१५ यामध्ये कलम २ (२५) तसेच कलम ३१ (१)(३) मध्ये उल्लेख आहे. हा प्रकल्प तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी अकोला या संस्थेद्वारे संपूर्ण अकोला जिल्ह्यात राबविला जाणार आहे. चाइल्ड लाइन १०९८ ही काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाऱ्या मुलांसाठीची २४ तास चालणारी राष्ट्रीय आपत्कालीन मोफत फोन सेवा आहे. महिला व बालविकास केंद्रीय मंत्रालयाचा चाइल्ड लाइनला आधार आहे. चाइल्ड लाइन राज्य सरकार, एनजीओ, अलाईडसिस्टिीम आणि कॉर्पोरेट सेक्टरशी जोडलेले असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.हरविलेले, सापडलेली, आश्रयाची गरज असणारे, अत्याचारग्रस्त, वैद्यकीय मदतीची गरज असणारे, धोक्याच्या ठिकाणी काम करणारी, अनर्थकारी परिस्थितीत सापडलेली मुले, काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असलेल्या चिमुकल्या मुले व मुलींना चाइल्ड लाइनची मदत होणार आहे. विपरीत परिस्थितीत असलेली बालके आढळल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनला १०९८ या क्रमांकावर फोन लावून बालकाची मदत करू शकतात. अनेक वेळा विपरीत परिस्थितीत उद्भवल्यास पोलिसांचे तत्काळ पोहचणे शक्य नसते. अशा वेळी नागरिकांनी निडर होऊन त्या बालकाची मदत करावी. जर पोलिसात तक्रार केली तर आपल्यावरच पोलीस कारवाई करतील, अशा गैरसमजातून अनेक नागरिक बालकांची मदत करीत नाहीत; परंतु अशा नागरिकांना पोलीस यंत्रणा नेहमीच प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही भय मनात न ठेवता अशा बालकांच्या मदतीसाठी पुढे येऊन १०९८ वर फोन करू न संबंधित यंत्रणेला सजग करावे. अकोल्यात यापूर्वी १०९८ हेल्पलाइन सुरू होती; मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही हेल्पलाइन बंद झाली. आता तिक्ष्णगत संस्थेमार्फत ही हेल्पलाइन बालकांच्या कल्याणार्थ सुरू करण्यात आली असून, अविरत राहील, अशी ग्वाही यावेळी संजय सेंगर यांनी दिली. पत्रकार परिषदेला विष्णुदास मुंडोकार, श्रीकांत पिंजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक