कान्हेरी सरपच्या कृषी पर्यटन केंद्रात शॉक लागून बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 9, 2016 02:02 IST2016-06-09T02:02:18+5:302016-06-09T02:02:18+5:30

आकस्मिक मृत्यूची नोंद; मृत बालक वाशिम जिल्ह्यातील.

Child death due to shock at Kanheri Sarp's Agriculture Tourism Center | कान्हेरी सरपच्या कृषी पर्यटन केंद्रात शॉक लागून बालकाचा मृत्यू

कान्हेरी सरपच्या कृषी पर्यटन केंद्रात शॉक लागून बालकाचा मृत्यू

बाश्रीटाकळी (जि. अकोला): तालुक्यातील कान्हेरी सरप येथील वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्रावर कुटुंबीयांसह आलेल्या एका १४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी २ वाजता घडली. निशांत श्रीकृष्णराव चोपडे (रा. खडी धामणी जि. वाशिम) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरू ळपीर तालुक्यातील खडी धामणी येथील चोपडे कुटुंबीय बुधवारी सकाळी कान्हेरी सरप येथील शेतकरी नेते व उद्योजक प्रकाश पोहरे यांच्या मालकीच्या वेदनंदिनी पर्यटन केंद्रावर पोहोचले. निशांतचे आई-वडील व इतर नातेवाईक पर्यटन केंद्रावर हजर असतानाच बाजूच्या शॉवरखाली लहान मुले आंघोळ करीत होते. निशांत हा आंघोळ करू न बाहेर आला असता, कंपाउंडजवळ त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. ही बाब येथील कर्मचार्‍यांच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच वेदनंदिनी पर्यटन केंद्रातील एका वाहनाने त्याला तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात हलविले; परंतु उपचाराआधीच त्याची प्राणज्योत मालवली. सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर निशांतचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करू न प्रकरण बाश्रीटाकळी पोलिसांकडे वर्ग केले.

Web Title: Child death due to shock at Kanheri Sarp's Agriculture Tourism Center