‘चिल्लर’चा ठोक काळाबाजार
By Admin | Updated: June 7, 2014 00:39 IST2014-06-07T00:39:25+5:302014-06-07T00:39:25+5:30
जादा पैसे मोजून नाणी मिळतात; अकोला शहरात ‘कॉइन्स माफियां’च्या टोळ्या सक्रिय

‘चिल्लर’चा ठोक काळाबाजार
अकोला : सुट्या नाण्यांची काळय़ाबाजारात विक्री करण्यासाठी शहरात कॉइन्स माफियांच्या टोळ्याच सक्रिय असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्ण चमूने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उजेडात आले आहे. १३ टक्के जादा पैसे मोजून सुट्या नाण्यांची विक्री करण्यात येत आहे. शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे चिल्लर विक्रीचा ठोक काळाबाजार अव्याहतपणे सुरू आहे.
दैनंदिन व्यवहारात किरकोळ व्यावसायिकांना सुट्या नाण्यांची (चिल्लर) आवश्यकता भासते. यामध्ये भाजी विक्रेते, किरकोळ किराणा, हॉटेल व कटलरी व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स, शीत पेय विक्रेत्यांचा समावेश आहे. ग्राहकांकडून सुटे पैसे देण्यात येत नसल्याने व्यावसायिकांना चिल्लरची अडचण येते. व्यावसायिकांना सुटे नाणे उपलब्ध करून देण्यासाठी ह्यकॉइन्स माफियांह्णनी जादा दरात चिल्लरची विक्री करण्याचा गोरखधंद्याच सुरू केला आहे. या ह्यकॉइन्स माफियांह्णनी मुख्य बाजारपेठमध्ये सुट्या नाण्यांची दुकानेच थाटली आहेत. राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून पुरेसी चिल्लर उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांपुढे या ह्यकॉइन्स माफियांह्णकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. व्यावसायिकांच्या या अगतिकतेचा फायदा घेत ह्यकॉइन्स माफियेह्ण जादा पैसे उकळतात. त्यामुळे सुट्या नाण्यांचा काळाबाजार थांबविण्याची मागणी होत आहे.