मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 14:39 IST2018-10-15T14:30:19+5:302018-10-15T14:39:38+5:30
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर स्वागत
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी अकोला विमानतळावर आगमन झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोमवारी सकाळी १० वाजता अकोला विमानतळावर आगमन झाले.पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे,आमदार बळीराम सिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात पाटील, माजी आमदार डॉ.जगन्नाथ ढोणे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, डॉ.अशोक ओळंबे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेच अकोला विमानतळ येथून हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांनी बुलडाणा येथे आयोजित आढावा बैठकीसाठी प्रयाण केले. यावेळी विमानतळावर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री आगमनाच्या पृष्ठभूमीवर विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.