मुख्यमंत्री ७ जूनला अकोल्यात!
By Admin | Updated: May 27, 2017 00:56 IST2017-05-27T00:56:57+5:302017-05-27T00:56:57+5:30
अकोला: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जून रोजी अकोला दौऱ्यावर येत असून, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांची पाहणी करून, विविध विकासकामांसंबंधी आढावा बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री ७ जूनला अकोल्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जून रोजी अकोला दौऱ्यावर येत असून, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कामांची पाहणी करून, विविध विकासकामांसंबंधी आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जून रोजी अकोला दौऱ्यावर येत असल्याची सूचना शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली.
त्यानुसार अकोला दौऱ्यात मुख्यमंत्री जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठक घेणार आहेत.