सोलापुरातील दुहेरीकरणाच्या कामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:26 IST2019-08-26T13:26:20+5:302019-08-26T13:26:26+5:30
सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गाने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

सोलापुरातील दुहेरीकरणाच्या कामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल
अकोला : सोलापूर विभागात होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे या मार्गाने जाणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
गाडी संख्या ११४०६ अमरावती ते पुणे २६ आॅगस्ट रोजी अकोला, भुसावळ, मनमाड, दौड, पुणे अशी धावेल. गाडी संख्या ११४०५ पुणे ते अमरावती २७ आॅगस्ट रोजी पुणे, दौड, मनमाड, भुसावळ, अकोला अशी धावेल. गाडी संख्या ११४०३ नागपूर ते कोल्हापूर २७ आॅगस्ट रोजी अकोला, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, दौड, पुणे, मिरज, कोल्हापूर अशी धावेल. गाडी संख्या ११४०४ कोल्हापूर ते नागपूर २६ आॅगस्ट रोजी कोल्हापूर, मिरज, पुणे, दौड, मनमाड, अंकाई, औरंगाबाद, अकोला अशी धावेल. गाडी संख्या ११०११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड २८ आॅगस्ट रोजी मनमाड, अंकाई, नांदेड अशी धावेल. गाडी संख्या ११०१२ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस २९ आॅगस्ट रोजी नांदेड, अंकाई मनमाड अशी धावेल. गाडी संख्या ११०७५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बीदर २७ आॅगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड, औरंगाबाद, अंकाई, परभणी, बिदर अशी धावेल. गाडी संख्या ११०७६ बिदर ते लोकमान्य टिळक टर्मिनस २८ आॅगस्ट रोजी परभणी, औरंगाबाद, अंकाई, मनमाड अशी धावेल. प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.