शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

मधुमेह, क्षयरोग रुग्णांच्या आहारात बदल : रुग्णांसाठी नवीन वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:28 IST

अकोला : शासकीय रुग्णालयात दाखल विविध रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये शासनाने तब्बल ३० वर्षांनंतर बदल केला आहे.

- प्रवीण खेतेअकोला : शासकीय रुग्णालयात दाखल विविध रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये शासनाने तब्बल ३० वर्षांनंतर बदल केला आहे. यापूर्वी १९९६ च्या शासन निर्णयानुसार रुग्णांना आहार दिला जात होता. यात राज्याच्या आरोग्य विभागाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नियमावलीनुसार आवश्यक बदल केले असून, यापुढे नव्या नियमानुसारच रुग्णांना आहार दिला जाणार आहे.सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे हृदयविकार, मूत्रपिंड, यकृत, टीबी, उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यात मोठ्यांसह लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांना सरकारी रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत; पण औषधोपचारासह पौष्टिक आहारही मिळावा, यासाठी रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाºया आहारात बदल करण्यात आला आहे. राज्य शासनातर्फे तब्बल ३० वर्षांनंतर रुग्णांना देण्यात येणाºया आहारामध्ये बदल केले. त्यानुसार मधुमेह, क्षयरोगाचे रुग्ण, रुग्णालयातील आंतररुग्ण आणि मनोरुग्णालयातील रुग्ण यांच्या आहारात बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमावलीनुसार बालरुग्ण, मधुमेह, क्षयरुग्ण, प्रौढ रुग्ण आणि मनोरुग्णालयातील रुग्ण यांना रोज कोणता आहार द्यायचा, या आहाराचे प्रमाण किती असावे, दिवसात कोणत्या वेळी चहा, नास्ता द्यायचा, कोणत्या वेळी जेवण द्यायचे, याबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यापुढे नवीन वेळापत्रकानुसार रुग्णांना आहार देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिली आहे.‘आयसीएमआर’ मानकानुसार बदलआरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षय रुग्णालये आणि मनोरुग्णालयांसह उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होणाºया रुग्णांच्या आहारात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मानकानुसार हे बदल करण्यात आले आहेत.या रुग्णांच्याही आहाराचे प्रमाण निश्चितमधुमेह, क्षयरोग रुग्णांव्यतिरिक्त दवाखान्यातील बालरुग्ण, शस्त्रक्रिया झालेले बालरुग्ण, कॅन्सर रुग्ण, जळीत रुग्ण, मनोरुग्ण, मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण, पोषण पुनर्वसन केंद्रातील बालके यांच्या आहाराचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.गर्भवतींसाठी मांसाहारनवीन नियमावलीनुसार गर्भवतींसह वृद्ध रुग्ण आणि बालरुग्णांना दुपारच्या जेवणात डाळीऐवजी मांसाहार दिला जाणार आहे. आतापर्यंत त्यांना केवळ अंडी दिली जात होती. आता अंडीऐवजी मांसाहार व मासे दिले जाणार आहेत. गंभीर आजार असणाºया रुग्णांना आहारातून पौष्टिक घटक कसे मिळतील, याकडेही अधिक लक्ष दिले जाणार आहे.रुग्णांच्या आहारात तब्बल तीस वर्षांनी बदलराज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळावा, या अनुषंगाने आयसीएमआरच्या शिफारशीनुसार सुधारणा केली आहे. त्यानुसार रुग्णांना उत्कृष्ट दर्जाचा आहार दिला जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यdiabetesमधुमेहHeart Diseaseहृदयरोग