बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवावा : गहिलाेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST2021-01-13T04:46:44+5:302021-01-13T04:46:44+5:30
पातूर : कोविड-१९मुळे शिक्षण क्षेत्रात फार माेठे बदल झाले आहेत. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल घडवून शैक्षणिक क्रांती घडवावी, ...

बदलत्या काळानुसार स्वतःत बदल घडवावा : गहिलाेत
पातूर : कोविड-१९मुळे शिक्षण क्षेत्रात फार माेठे बदल झाले आहेत. विद्यार्थी हितासाठी शिक्षकांनी स्वत:मध्ये बदल घडवून शैक्षणिक क्रांती घडवावी, असे आवाहन बेरार एज्युकेशन साेसायटी पातूरच्या सचिव स्नेहाप्रभादेवी गहिलाेत यांनी केले.
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व. सरलाबाई गहिलोत जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्या बाेलत हाेत्या. प्रास्ताविक प्राचार्य बी. एम. वानखडे यांनी केले. सरलाबाई गहलोत यांच्या जीवन प्रवासाबद्दल साेसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहलोत यांनी प्रकाश टाकला. प्रा. के. व्ही. तायडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, प्राचार्य बी. एम. वानखडे, प्राचार्य एस. श्रीनाथ, बाभुळगाव शाखा, उपप्राचार्य एस. बी. ठाकरे, मदर इंडिया कॉन्व्हेंटच्या प्राचार्य एम. पी. उंबरकर यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पी. पी. वाकोडे यांनी केले. आभार प्रदर्शन एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे यांनी केले.