शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’चे सभापती पद; भाजपची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:27 IST

सभापती पदासाठी निष्ठावान नगरसेवकाची निवड करण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदावर विराजमान होण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांकडून ‘लॉबिंग’ केल्या जात असले तरी यावेळी प्रथमच सभापती पदासाठी निष्ठावान नगरसेवकाची निवड करण्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाला २०२२ मधील महापालिका व २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत यश मिळवायचे असेल, तर पक्षाची बोळवण करणाऱ्यांना संधी कशी, असा सवाल यानिमित्ताने पक्षातून उपस्थित केला जात असल्याची माहिती आहे.महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीसाठी नवीन ११ सदस्यांची निवड प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडली. भाजपच्यावतीने नगरसेवक सतीश ढगे, विजय इंगळे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार व संजय बडोणे यांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त शिवसेना आघाडीचे दोन, काँग्रेस पक्षाकडून दोन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडीच्यावतीने दोन अशा एकूण अकरा सदस्यांची निवड करण्यात आली होती.स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ दहा असल्याने सभापती पदावर भाजप सदस्याची निवड होईल, यात दुमत नाही. २०१७ मध्ये पहिल्याच वर्षी भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबवित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांचे चिरंजीव नगरसेवक विशाल इंगळे यांना सभापती पदाची संधी बहाल केली. त्यावेळी २०१९ मधील विधानसभेची आकडेमोड ध्यानात ठेवून विशाल इंगळे यांची निवड केल्याची चर्चा होती. दुसºया वर्षी बाळ टाले यांना व तिसºया वर्षी शिवसेनेतून भाजपवासी झालेले विनोद मापारी यांना सभापती पदाची संधी देण्यात आली. अर्थात, बाळ टाले वगळता इतर पक्षातून आलेल्या नगरसेवकांना भाजपने प्राधान्य दिल्याचे दिसून येते.यावेळी सभापती पदाच्या निवडीसाठी पक्षाचा निकष नेमका कोणता, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, अनेकांचा पूर्वानुभव लक्षात घेता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागल्याची खमंग चर्चा रंगली आहे.

भाजप माझी माय अन्...२०१२ मध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपमधील अनेक विद्यमान नगरसेवकांनी ऐनवेळेवर पक्षाची एकनिष्ठा गुंडाळून ठेवत काँग्रेसप्रणीत अकोला विकास आघाडीच्या पारड्यात मतांचे दान केले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये महापौर पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान संबंधित नाराज नगरसेवक पक्षात परतले. त्यावेळी पक्ष कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजप माझी माय अन्...असे भावनिक उद्गार काढणाºया नगरसेवकांनी खिसे जड झाल्यावरच महापौरांच्या बाजूने मतदान केले होते, हे येथे उल्लेखनीय. अशा नगरसेवकांची सभापतीपदी निवड होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपाAkolaअकोला