शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:01 PM

ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.

अकोला : केंद्र सरकार हे ओबीसींविरोधी सरकार आहे. त्यामुळेच ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. २०१७ पासून ते आजपर्यंत या धोरणामुळे ११000 ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसीला कायद्यानुसार दिलेले २७ टक्के आरक्षणाची पूर्तता नीट द्वारे दिलेल्या वैद्यकीय प्रवेशामध्ये झालेली नाही. देशपातळीवरील आॅल इंडिया फेडरेशन आॅफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी विस्तृत अशी आकडेवारी जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट उघड केला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आॅल इंडिया हा नॅशनल इलिजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एन.ई.ई.टी.) मार्फत भरल्या जात असून, केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्यक असणारे आरक्षण सन २०१७ पासून कमी केले आहे व त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे; परंतु केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट आॅफमध्ये बदल घडवून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र २०१७-१८, २०१९-२० या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ओबीसीचे ११ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. वस्तुत: भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरुस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे; परंतु केंद्र सरकार हे ओबीसींचे हक्क डावलणारे सरकार असून, आरक्षणच संपविण्याचा घाट या संस्थेने घातला असल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितकडून आंदोलनाचा इशाराओबीसींना हक्क असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल. वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील अन्याय सरकारने तत्काळ दूर करावा, अन्यथा कोरोनाची भीती बाजूला ठेवून आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांना आंदोलनाची हाक देऊ. वंचितच्या बॅनरखाली हे आंदोलन करणार असून, जेवढे आरक्षणवादी आहे ते सर्व या आंदोलनाला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिनी सैनिक मागे गेले, पुढे किती आले होते?भारत आणि चीनमधील तणाव ही नुरा कुस्ती आहे, असे मी मागेच म्हणालो होतो. आता चिनी सैन्य दोन किमी मागे सरकले, असे सरकार सांगत आहे. सरकारने चिनी सैनिक किती पुढे आले होते, याचेसुद्धा जनतेला स्पष्टीकरण द्यावे. उगाच माहिती लपविण्याचा प्रयत्न करू नये, असे आव्हान अ‍ॅड. आंबेडकर यांनी सरकारला दिले.

राज्य सरकार पडणार नाही-आंबेडकरराज्य सरकारमधील विविध पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्या तरी सरकार पडणार नाही, असे दिसते. कोणत्याच आमदाराला आता निवडणुका नकोत. त्यामुळे आमदारांच्या दबावात हे सरकार चालेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले. सरकार कधी पडेल, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतील. ते ज्योतिषी आहेत, मी नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर