लैंगिक शोषण प्रकरणात कोठडी

By Admin | Updated: August 5, 2016 01:30 IST2016-08-05T01:30:21+5:302016-08-05T01:30:21+5:30

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरण.

The cell in the sexual abuse case | लैंगिक शोषण प्रकरणात कोठडी

लैंगिक शोषण प्रकरणात कोठडी

अकोला: अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शोषण करणारा आरोपी आकाश काटे याला गुरुवारी दुपारी आकोट फैल पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आकोट फैल परिसरात राहणार्‍या एका १६ वर्षीय मुलीला आरोपी आकाश सिद्धार्थ काटे (रा. इंदिरा नगर) याने प्रेमाच्या जाळय़ात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखविले आणि तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले यातून मुलीचा गर्भधारणा झाली. मुलीने त्याला लग्नाविषयी विचारले असता, तो टाळाटाळ करू लागला. मुलीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने बुधवारी आकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Web Title: The cell in the sexual abuse case