Celebration stop on half way | अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!
अर्ध्यावरतीच मोडला जल्लोषाचा डाव!

- राजेश शेगोकार 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राजकारण हा गृहितांचा खेळ नाही, कधीही काहीही होऊ शकते या उक्तीचा प्रत्यय सोमवारी अकोल्यातील शिवसैनिकांसह राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आला आहे. राज्यात महाशिवआघाडी अस्तित्वात आली आहे, शिवसेना नेते सत्तेचा दावा करण्यासाठी राज्यपालांच्या निवासस्थानी पोहोचले हे माध्यमांमधून समोर आल्यावर अकोल्यात शिवसेना व राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली होती. प्रसार माध्यमांना याबाबत कळविण्यातही आले, सोशल मीडियावरही आमंत्रणे झळकली अन् राज्यपालांनी सेनेला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याचे समोर आले. या प्रकारामुळे साडेसातनंतरच्या पंधरा मिनिटात साºया तयारीचा डाव अर्ध्यावरतीच मोडावा लागला.
शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस अशा पक्षांनी एकत्र येत महाशिवआघाडीचे अस्तित्व तयार झाल्याची चर्चा दिवसभर होती. संध्याकाळी या चर्चेने जोर पकडला, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच अकोल्यातील पदाधिकाºयाचे डोळे व कान मुंबईकडे लागून होते. अखेर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारांसह आदित्य ठाकरे हे राजभवनाकडे निघाल्यावर जिल्हाभरात जल्लोष सुरू झाला. सोशल मीडिीयावर अनेक मेसेजच झळकू लागले, भाजपाची खिल्ली उडविणारे, सेनेला वरचढ दाखविणारे अन् पवारांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळणाºया मेसेजचा पूर माध्यमांमध्ये आला होता. कोणत्याही क्षणी आदित्य ठाकरे बाहेर येतील अन् उद्या आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत, असे जाहीर करतील त्या क्षणाला अकोल्यात जल्लोषाचे फटाके, ढोल-ताशांचा गजर अन् गुलालांची उधळण करून महाशिवआघाडीच्या नव्या सत्तेच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. नेहरू पार्क परिसर, गांधी मार्गावर शिवसेनेच्या वतीने तर खुल्या नाट्यगृहासमोर राष्टÑवादी काँग्रसेने जल्लोषाची तयारी केली होती. फटाके आणून ठेवले, ढोल-ताशे बुक झाले, गुलालाची पोती आणली; पण आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहून सारेच थंडावले. जल्लोषात ‘आवाज कुणाचा?’ याला ‘महाशिवआघाडीचा’ हे उत्तरही तयार होते; मात्र सारेच थांबले. उद्या कदाचित सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी लागेल या आशेने सारेच पदाधिकारी पुन्हा हिरमोड होऊन परतल्याचे चित्र अकोल्यात होते.

तर सारेच नावापुरते आमदार
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेस मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्यपाल कोणती भूमिका घेतात, यावर आमदारांचे संवैधानिक भविष्य अवलंबून आहे. राज्यपालांनी कोणालाही सत्ता स्थापनेची संधी दिली नाही अन् जर राष्टÑपती राजवटीची शिफारस केलीच तर सर्व नवनिर्वाचित आमदार हे केवळ नावापुरते आमदार राहतील. त्यांना आमदार म्हणून कोणतेही अधिकार राहणार नाहीत, ते कोणतीही बैठक बोलावू शकणार नाहीत, ना कोणते निर्देश देऊ शकतील, त्यामुळे केवळ नवनिर्वाचित आमदार म्हणून कागदोपत्री मिरवणे एवढेच त्यांच्या हाती राहील.
४अकोल्यातील पाचपैकी चार आमदार हे पुन्हा विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांना माजी आमदार म्हणून जे वेतन व भत्ते मिळतात ते कायम राहतील; मात्र बाळापूरचे आमदार म्हणून विजयी झालेल्या नितीन देशमुख यांना विधानसभा अस्तित्वात येऊन आमदार म्हणून शपथ घेतल्यावरच वेतन व भत्ते मिळू शकतील. राष्टÑपती राजवट लागलीच तर देशमुखांना ही संधीसुद्धा मिळणे कठीण होईल. त्यामुळे राज्यातील पेचप्रसंगाकडे सर्वांचचे लक्ष लागून आहे.


राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी आशेवर !
सोमवारी रात्री राष्टÑवादी काँग्रेसला राज्यपालांनी आमंत्रण दिल्यामुळे जल्लोष रद्द केलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे. पवार साहेब ‘गेम’ बसवतीलच ही आशा राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांना निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पदाधिकारी सोमवारी रात्रीच्या या घडामोडीवर गॅसवर गेले आहेत. राजकारणाच्या या हाय होल्टेज ड्रामामुळे कार्यकर्त्यांचा जीव मात्र वर खाली होत आहे.

 

Web Title: Celebration stop on half way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.