पातूर येथे कृषी दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:31 IST2019-07-01T18:30:57+5:302019-07-01T18:31:16+5:30

खानापूर : खानापूर-पातूर मार्गावरील भावना पब्लिक स्कुल येथे विद्यार्थ्यांकडून कृषी दिन साजरा करण्यात आला.

Celebrate Agriculture Day at Patur | पातूर येथे कृषी दिन साजरा

पातूर येथे कृषी दिन साजरा

खानापूर : खानापूर-पातूर मार्गावरील भावना पब्लिक स्कुल येथे सोमवार, १ जुलै रोजी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला अंधारे येथील विद्यार्थ्यांकडून कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर वृक्षदिंडी आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य करिश्मा पवार व संचालिका शितल अमोल सोनोन ेयांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. याप्रसंगी प्रा. पवार यांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले. कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, प्रा. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी गिते व नितीश गुंडाला यांंनी हा कार्यक्रम घेतला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Celebrate Agriculture Day at Patur