हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

By Admin | Updated: August 3, 2015 01:50 IST2015-08-03T01:50:42+5:302015-08-03T01:50:42+5:30

आकोट पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचा-याचा मृत्यू.

Cardiac death of cardiac employee by heart attack | हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

अकोला - आकोट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ४५ वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा रविवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी एका पोलीस कर्मचार्‍याने आत्महत्या केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एका पोलीस कर्मचार्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. देवी पोलीस लाइन येथील रहिवासी गजानन ऊर्फ सुंदर निरंजन इंगळे (४५) यांच्या प्रकृतीत रविवारी बिघाड झाला. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: Cardiac death of cardiac employee by heart attack